पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४-PM Vishwakarma Kausalya Sanman Yojana Maharashtra योजनेंतर्गत सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योगाकरिता १ ते २ लाख रु पर्यंत कर्ज मिळवा अर्ज करा

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४-PM Vishwakarma Kausalya Sanman Yojana Maharashtra लाभ मिळवण्यासाठी योजना काय आहे ,योजनेचे फायदे ,योजनेची  पात्रता निकष ,अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबत माहिती मिळवा व लाभ  घ्या .

नमस्कार

Table of Contents

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ महाराष्ट्र -P M Vishwakarma Kausalya Sanman Yojana Maharashtra या सदर योजनेची सविस्तर माहिती आजच्या या लेखात घेणार आहोत .चला तर मग पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना काय आहे ,योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत ,लाभ कोण घेऊ शकते, नोंदणी प्रक्रिया किंवा अर्जाची प्रक्रिया कशी असेल इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहूया .

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ योजना काय आहे ?

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ सदर योजना देशातील गरजू आणि लोप पावत चाललेल्या विश्वकर्मा समाजातील  पारंपारिक कारागीरांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजनेंतर्गत सहकार्य केले जाणार आहे .

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना भारतातील महाराष्ट्र सह इतर सर्व राज्यासाठी लागू आहे .विश्वकर्मा समाजातील पारंपारिक कारागीर यांच्यासाठी  योजना लागू आहे .ज्यामध्ये सोनार ,सुतार ,नाविक , लोहार ,कुंभार , चांभार ,शिंपी ,धोबी ,घिसाडी ,गवंडी ,माळी ,मूर्तिकार ,वडारी (दगड फोडणारे ) ,झाडू बनविणारे ,काथ्या विणकर ,कुलूप किल्ली बनवणारे ,कैकाडी (दुरडी ,झाप ,सूप ,टोपली ,इत्यादी बनविणारे),मासेमारी साठी लागणारे जाळे  विणणारे ,फुलांचे हर बनवणारे ,बाहुल्या आणि खेळणी तयार करणारे , इत्यादी विविध क्षेत्रातील कारागिरांचा यात समावेश आहे.

सदर योजनेंतर्गत लाभ हा विश्वकर्मा समाजातील सर्व जातीच्या पारंपारिक कारागिरांना होणार असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे .तसेच त्यांना १ लाख ते २  लाख रु पर्यंत ५ % व्याजदरा सह अर्थसहाय्य हे ५ वर्षाकरिता विनातारण बँकेमार्फत दिले जाणार आहे . तसेच  स्थानिक आणि  जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे .त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे ,त्यांच्या सेवेत सुलभपण निर्माण करून देणे .आणि त्यांना बाजापेठेशी सलंग्न करणे इत्यादी उद्देशच्या माध्यमातून कारागिरांचा विकास साधने इत्यादी योजनेंतर्गत साध्य केले जाणार आहे .

सदर योजनेच्या पहिल्या टप्यातील बजेट १३००० ते १५००० कोटी इतके आहे .पाच वर्ष कालावधीसाठी योजना राबवली जाणार असून आर्थिक वर्ष २०२३-२४ ते २०२७-२८ हा कालावधी असणार आहे .

बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ कामगारासाठीच्या सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ योजनेचा कालावधी –

सदर योजनेचा कालावधी हि योजना ५ वर्षाकरिता असणार आहे .

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ योजनेचा उद्देश – 

  • पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ भारतातील सर्व लघु ,सूक्ष्म ,तसेच मध्यम पारंपारिक उद्योगातील कारागिरांना प्रशिक्षण देणे ,स्थानिक व जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे ,त्यांच्या कौशल्य विकसित करणे ,आणि अर्थसहाय्य कर्जाच्या स्वरुपात त्यांना उपलब्ध करून देणे इत्यादी उद्देश पूर्तीसाठी योजना राबवली जाणार आहे .
  • पारंपारिक कारागीराद्वारे तयार केलेल्या वस्तू व उत्पादन याची गुणवत्ता वाढवणे त्यांच्या सेवेत सुलभता आणणे हे योजनेचे उद्देश आहे  .
  • त्यांच्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करून रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे होय .
  • विश्वकर्मा समाजातील लोकांची अर्थीक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना सहकार्य करणे .

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४  योजनेचे लाभार्थी कोण असतील  –

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ योजनेंतर्गत विश्वकर्मा समाजातील पारंपारिक कारागीर यांच्यासाठी  योजना लागू आहे . ज्यामध्ये सोनार ,सुतार ,नाविक , लोहार ,कुंभार , चांभार ,शिंपी ,धोबी ,घिसाडी ,गवंडी ,माळी ,मूर्तिकार ,वडारी (दगड फोडणारे ) ,झाडू बनविणारे ,काथ्या विणकर ,कुलूप किल्ली बनवणारे ,कैकाडी (दुरडी ,झाप ,सूप ,टोपली ,इत्यादी बनविणारे),मासेमारी साठी लागणारे जाले विणणारे ,फुलांचे हर बनवणारे ,बाहुल्या आणि खेळणी तयार करणारे , इत्यादी विविध क्षेत्रातील कारागिरांचा यात समावेश आहे.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ योजनेची पात्रता आणि निकष –

  • पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय नागरिक आसावा  .
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तो विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या जातीतील असावा .
  • सरकारी सेवेत कार्यरत असणारे व्यक्ती अथवा कुटुंब सदर योजनेसाठी पात्र नसेल .
  • तसेच राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या उदा – मुद्रा  लोन अशा योजनेसारख्या इतर योजनेचा लाभ गेल्या ५ वर्षात घेतलेला नसावा .
  • लाभ घेण्यासाठी लाभार्थीचा पारंपारिक व्यवसाय असावा .
  • वरील निकषाची पूर्तता केल्यास संबधित लाभार्थी योजनेस पात्र असेल .

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे –

सदर योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी लाभार्थीला खालील कागदपत्राची आवश्यकता आहे  .

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशिल
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • मतदान कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ योजनेचे  फायदे / लाभाचे स्वरूप ,टप्पे –

  • पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ सदर योजनेंतर्गत वरील पारंपारिक कारागिरांना २ हप्त्यात कर्ज हे विनातारण बँकेमार्फत दिले जाणार आहे .
  • कर्जाचा पहिला हप्ता १ लाख रु हा १ वर्ष ६ महिन्यासाठी दिला जाईल .
  • तर कर्जाचा दुसरा हप्ता हा २ लाख रु पर्यंत २ वर्ष  ६ महिन्यासाठी दिले जाईल .
  • लाभार्थी कारागिरांना सुरुवातीला ५ दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे .
  • जो लाभार्थी प्रशिक्षण पूर्ण करेल त्यास दैनंदिन ५०० रु प्रशिक्षण भत्ता देखील दिला जाणार आहे .
  • तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सबंधित लाभार्थी कारागिरास रुपये १५०००/- पर्यंत उद्योग साहित्य( टूलकीट प्रोत्साहन ) किंवा रक्कम दिली जाईल .
  • लाभार्थी प्रशिक्षण पूर्ण करेल त्यास प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल .

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ योजनेतील मुख्य घटकाचा तपशील –

योजनेचे नावपीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना 2024
योजनेची सुरुवात१७ सप्टेंबर २०२३
शासनामार्फतकेंद्रशासन व राज्यशासन
योजनेचा उद्देशविश्वकर्मा समाजातील पारंपारिक कारागीर प्रशिक्षण देणे पारंपारिक कारागीराद्वारे तयार केलेल्या वस्तू व उत्पादन याची गुणवत्ता वाढवणे त्यांच्या सेवेत सुलभता  आणणे हे योजनेचे उद्धिस्त आहे .

 

लाभाचे स्वरूप१ लाख ते २ लाख रु पर्यंत विनातारण कर्ज
लाभार्थीविश्वकर्मा समाजातील सर्व जाती
योजनेचा कालावधी ५ वर्ष
अधिकृत संकेतस्थळhttps://pmvishwakarma.gov.in/
हेल्प लाईन क्रमांक१८००२६७७७७७

 

 पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना 2024 online नोंदणी प्रक्रिया / अर्ज प्रक्रिया-

सदर योजेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर login करणे गरजेचे आहे त्याची प्रक्रिया आपण खालीलप्रमाणे पाहूया .

  • पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ https://pmvishwakarma.gov.in/  जाऊन Home पेज वरील How to Register या पर्यायावर किल्क करा .
  • त्यानंतर नोंदणी करण्यासाठी काही स्टेप दिल्या आहेत त्या फॉलो करा .
  • नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकून तो verify करा .
  • मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकून तो verify झाला कि नोंदणी form open होईल त्यामध्ये तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती सविस्तर भरावयाची आहे .
  • त्यानंतर त्याबरोबर आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करा .
  • आणि आता कागदपत्रे अपलोड झाली कि नोंदणी form submit करा .
  • वरील सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल .
  • Login
  • वरील प्रमाणे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी username आणि password मिळेल .
  • तो मिळालेले  username आणि password याद्वारे login करून अर्ज प्रक्रिया ,प्रशिक्षण बाबत माहिती , योजनेचे प्रमाणपत्र इत्यादी संबधित सर्व माहिती मिळेल .
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ निष्कर्ष – 

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ सदर योजनेची सविस्तर माहिती आजच्या लेखात वरील प्रमाणे दिली आहे ज्यामध्ये योजना काय आहे ,त्याची उद्दिष्टे ,योजनेचे फायदे ,अर्ज प्रक्रिया ,लाभार्थी कोण आहेत , पात्रता निकष इत्यादि बाबत सविस्तर माहिती दिली आहे .तेंव्हा वरील सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर इतरांनबरोबर हि शेअर कराल  .

धन्यवाद !

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ FAQ –
१. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ सदर योजने साठी अर्ज कसा करावा ?
  • केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ https://pmvishwakarma.gov.in/  जाऊन Home पेज वरील How to Register या पर्यायावर किल्क करा .त्यानंतर नोंदणी करण्यासाठी काही स्टेप दिल्या आहेत त्या फॉलो करा.

२. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४ सदर योजने अंतर्गत किती रुपयापर्यंत कर्ज मिळेल आणि व्याजदर किती असेल ?

–  १ ते २ लाख रु पर्यंत कर्ज दिले जाईल . ते ५ % दराने ५ वर्षाकरिता दिले जाईल .

Leave a comment