पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ Pandit Dindyal Upadyay Swayam Yojana सविस्तर माहिती मिळवा आणि अर्ज करा .
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ प्रस्तावना-
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विध्यार्थ्यांकारिता र्ज्यात एकूण ४९१ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यापैकी मुलांसाठी २८३ तर मुलींसाठी २०८ वसतिगृहाची सुविधा आहे .ग्रामीण तसेच दुर्गम भागातून तालुका , जिल्हा तसेच मोठ्या शहरांच्या ठिकाणी मुले – मुली शिक्षणासाठी येतात परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे राहणे ,खाणे आणि इतर शिक्षणाचा खर्च परवडत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा मुलांसाठी राहण्याची ,भोजनाची तसेच इतर संबधित सुविधा पुरवण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत या मुला – मुलीना शासकीय वसतीगृहा मध्ये प्रवेश देण्यात येतो .
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ योजनेंतर्गत काय सुविधा मिळतात .योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत , पात्रता निकष ,अनुदान वितरण प्रक्रिया काय असते इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूया
स्वाधार योजना २०२४अंतर्गतअनुसूचित जाती आणि नवबोद्ध विद्यार्थीस अर्थसहाय्य
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ अटी व शर्ती –
- पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधित विध्यार्थी हा विध्यार्थ्याची १२ वि झालेली असावी किंवा १२ वि नंतरचे पुढील शिक्षण घेत असावा .
- निवड झालेस जास्तीत जास्त ७ वर्षापर्यंत लाभ मिळेल त्यानंतर लाभ घेता येणार नाही .
- संबधित विध्यार्थ्याने या अगोदर आदिवासी विकास विभागाच्या ,सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळलेला नसावा .
- विध्यार्थी हा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा नोकरी करत नसावा .
- अर्ज करन्यासाठी ५ एप्रिल २०२४ हि अंतिम मुदतवाढ आहे .
- अर्ज केलेल्या विध्यार्थ्यांना महाविध्यालय किंवा प्रकल्प कार्यालयाकडून sent Back असा Reply आला असेल त्यांनी लवकरात लवकर त्रुटी पूर्ण करून अर्ज Resubmit करावा अन्यथा D. B .T पासून वंचित राहावे लागेल .
- पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा ३० करण्यात आली आहे .
- अर्जदार विध्यार्थ्याने अर्जामध्ये स्वताचा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी सलंग्न केलेला असावा .
- अर्जदार विध्यार्थ्याचे बँक खाते असावे आणि ते आधारशी जोडलेले असावे
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ पात्रता आणि निकष –
- पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ योजनेचा लाभ मिळवण्याकरीता अर्जदार विध्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा .
- पालकाचे उत्पन्न रु २.५० लाख पेक्षा जास्त नसावे .
- ज्या शहरासाठी विध्यार्थ्याने अर्ज केलेला असेल त्याठिकाणी संबधित अर्जदाराचे पालक रहिवाशी नसावेत .
- आणि योजनेचा लाभ मिल्यानंतर संबधित अर्जदार विध्यार्थ्याने ज्या शहरत लाभ मिळाला असेल तेथे राहणे बंधनकारक असेल .
- केंद्र शासनाच्या पोस्ट म्याट्रिक शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल .तसेच लाभ घेण्यासाठीचा कलावधी हा २ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही .
- एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यास या योजनेचा लाभ अन ज्ञेय राहणार नाही .
- तसेच पहिली पदवी पूर्ण ण करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिल्यास सुधा लाभ घेता येणार नाही .
- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ,अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद ,वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी . मार्फत मान्यताप्राप्त महाविध्यालय / संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विध्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा .
- अर्जदार विध्यार्थ्याची संस्था किंवा महाविध्या लायातील उपस्थिती ८०% पेक्षा जास्त असावी लागेल .
- तसेच जो निवडक विध्यार्थी हा प्रतेक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमा च्या परीक्षेत उतीर्ण होणे अनिवार्य असेल .
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ मिळणारा खर्चाचा तपशील-
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ सदर योजनेंतर्गत खर्चाचे ३ प्रकारे वर्गीकरण करून त्यानुसार विध्यार्थ्याच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते . ती रक्कम कशा स्वरुपात दिली जाते ती खालीलप्रमाणे .
अ.क्र | खर्चाची बाब | मुंबई शहर ,मुंबई उपनगर ,नवी मुंबई .ठाणे , पुणे ,पिंपरी चिंचवड ,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी साठी रक्कम अनुज्ञेय राहील | इतर महसुली विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगर पालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्ठीसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम |
१ | भोजन भत्ता | ३२,००० | २८,००० | २५,००० |
2 | निवास भत्ता | २०,००० | १५,००० | १२,००० |
३ | निर्वाह भत्ता | ८,००० | ८,००० | ६,००० |
प्रती विध्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च | ६०,००० /- | ५१,००० /- | ४३,००० /- |
टीप – १. वरील खर्चाचा तपशील हा सदर योजनेचा १५ ऑक्टोबर २०१६ नुसार च्या gr नुसार दिला आहे .
वरील रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विध्यार्थी साठी प्रतिवर्ष रु .५,००० /- व अन्य शाखेतील विद्यर्थी प्रतिवर्षी रु २,०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल .
- विध्यार्थी ची संस्थेतील / महाविद्याल्यातील उपस्थिती ८० % पेक्षा अधिक असणे आवश्यक राहील त्याबाबत प्रत्येक तिमाहीत संबधित शिक्षण संस्थेकडून उपस्थिती पत्रक online प्रणालीद्वारे सादर करणे बंधनकारक राहील . सदर प्रमाणपत्राच्या आधारेच पुढील अनुज्ञेय रक्कम थेट विध्यार्थी च्या बँक खात्यात जमा करण्यात येईल .
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ अर्जाची पद्धत –
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी विध्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे online पध्दतीने अर्ज करावा लागेल त्यासाठी हि सबंधित योजनेच्या website ची लिंक .
- सदर योजनेबाबत अधिक माहिती मिळवायची असेल पंडित दीनदयाल स्वयम् योजना या वरती जाऊन तसेच टोल फ्री क्रमांक १८००२६७०००७ यावरती call करून माहिती मिळवू शकतात .
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ लागणारी कागदपत्रे –
- १२ वि मार्कमेमो
- वयाचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- अपंग असेल अपंग प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ निष्कर्ष –
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ सदर योजने बाबत आम्ही सर्व वाचकांसाठी सविस्तर अशी माहिती दिली आहे तरी संबधित माहितीचा वापर करून या योजनेचा लाभ घ्यावा .आणि इतरांनाही मिळवून द्यावा .जर योजनेबाबत काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर आमच्याशी call करून अथवा comment करून विचारू शकतात .
धन्यवाद !
FAQ –