पशुसंवर्धन योजना २०२५-२६स्वयं रोजगाराची राज्यस्तरीय योजना ७५% अनुदानानुसार शासकीय अनुदान १,१७,६३८-/-रुपयाची दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे .
महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील नागरिकाकरिता असणारी योजना .
प्रस्तावना –
पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील नागरिकांनकरिता सन २०२५-२०२६ राज्यस्तरीय ७५%अनुदान योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे. ज्या लोकांना स्वयं रोजगार उपलब्ध करण्याकरिता सदर योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी २ जुन पर्यंत online नोंदणी करणे आवश्यक होते .आणि ज्याचे नाव मंजूर झाले आहेत .त्यांनी सोबत जोडवयाची सर्व कागदपत्रे website वरती १५ जुन २०२५ च्या आत अपलोड करावेत .
राज्यस्तरीय योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे.अनुसूचित जाती व जमाती यांच्याकरिता ७५% अनुदानित तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदानित आहे .प्रकल्प मुल्यानुसार अनुसूचित प्रवर्गासाठी ७५% अनुदानानुसार शासकीय अनुदान रु १,१७,६३८ -/-रुपये तर स्वहिस्सा रु ३९,२१२ -/-रुपये असा असेल .तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदानानुसार शासकीय अनुदान रु ७८,४२५ रुपये तर स्वहिस्सा रु ७८,४२५ -/- रुपये इतका असेल .
पशुसंवर्धन योजना २०२५-२६ संबधित योजना कशा स्वरुपाची आहे त्याकरिता अर्ज कुठे ,कसा करायचा ? त्याकरिता शासनाची मदत किती मिळेल ?अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण या आजच्या या लेखात मिळवणार आहोत .चला तर मग मित्रानो खालिलप्रकारे आपण योजनेची सविस्तर माहिती घेऊ .

योजनेचे नाव –
पशुसंवर्धन योजना २०२५-२६ राज्य स्तरीय योजना-दोन दुधाळ गायी /म्हशीचे वाटप करणे .
पशुसंवर्धन योजना २०२५-२६ योजनेची माहिती –
- पशुसंवर्धन योजना २०२५-२६ महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत चालवली जाणारी राज्यस्तरीय योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे.सदर योजना संबधित घटकाकरिता जसे कि अनुसूचित जाती व जमाती यांच्याकरिता ७५% अनुदानित तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदानित आहे .सदर योजना प्रकल्प मुल्यानुसार अनुसूचित प्रवर्गासाठी ७५% अनुदानानुसार शासकीय अनुदान रु १,१७,६३८ -/-रुपये तर स्वहिस्सा रु ३९,२१२ -/-रुपये असा असेल .तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदानानुसार शासकीय अनुदान रु ७८,४२५ रुपये तर स्वहिस्सा रु ७८,४२५ -/- रुपये इतका असेल .
पशुसंवर्धन योजना २०२५-२६ योजनेकरिता संबधित लाभधारकास कोणत्या प्रकारच्या गायी / म्हशी मिळणार त्यांचे वाण कोणते –
- संकरित गाय –एच.एफ / जर्सी म्हैस – मुऱ्हा /जाफराबादी देशी गाय-गीर ,साहिवाल , रेड सिंधी , राठी ,थारपारकर देवणी , लाल कंधारी, डांगी आणि गवळाऊ इत्यादी प्रकारचे वय आहेत .
स्वयं रोजगाराची पशुसंवर्धन योजना २०२५-२६ लाभार्थी निवडीचे निकष –
- महिला बचत गट
- अल्प भूधारक शेतकरी .(१ ते २ हेक्टर शेती असणारे .)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार आणि स्वयं रोजगार केंद्रात नोंद असणारे असावेत.)

पशुसंवर्धन योजना २०२५-२६ मिळणारे अनुदान कशा स्वरुपात मिळणार .(प्रकल्पाची किंमत )
- संकरित गायींचा गट –
अ.क्र | बाब | जनावरांचा गट (रक्कम रुपात) |
१. | संकरित गायींचा गट- प्रती गाय रु. ७०,०००/- प्रमाणे दोन गायी चे | १,४०,०००/- |
२. | जनावरांसाठी गोठा | ० |
३. | स्वयं चलित चारा कटाई यंत्र | ० |
४. | खाद्य साठविण्यासाठी सेड . | ० |
५. | १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर दराने ३ वर्षाचा विमा ) | १६,८५०/- |
एकूण प्रकल्प किंमत | १,५६,८५०/- |
- म्हशीचा गट –
अ.क्र | बाब | जनावरांचा गट (रक्कम रुपात) |
१. | म्हशीचा गट –प्रती म्हैस रु. ८०,०००/- प्रमाणे दोन म्हैस | १,६० ,०००/- |
२. | जनावरांसाठी गोठा | ० |
३. | स्वयं चलित चारा कटाई यंत्र | ० |
४. | खाद्य साठविण्यासाठी सेड . | ० |
५. | १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर दराने ३ वर्षाचा विमा ) | १९,२५८ /- |
एकूण प्रकल्प किंमत | १,७९,२५८ /- |
गाय आणि म्हैस गट खरेदीकरिता त्यांच्या किंमतीनुसार शासकीय अनुदान आणि स्वहिस्सा किती भरणे गरजेचे असेलत्याचा सविस्तर तपशील खालील प्रकारे पाहूया –
अ.क्र | प्रवर्ग | जनावरांचा गट (रक्कम रुपात) | ||
१. | अनुसुचीत जाती -जमाती शासकीय अनुदान ७५% | स्वहिस्सा २५% | शासकीय अनुदान १,१७,६३८-/- रुपये | स्वहिस्सा ३९,२१२ -/-रुपये |
२. | सर्वसाधारण करिता – शासकीय अनुदान ५० % | स्वहिस्सा ५० % | शासकीय अनुदान ७८,४२५ रुपये | स्वहिस्सा ७८,४२५ रुपये |
पशुसंवर्धन योजना २०२५-२६ अर्जाबरोबर जोडवयाची कागदपत्रे.
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
- सातबारा
- ८ अ चा उतारा
- अपत्य दाखला किंवा स्वघोषणा पत्र
- आधारकार्ड
- ७-१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र , किंवा दुसर्यांची जमीन भाडे तत्वावर घेतली याचा करारनामा
- अनुसूचित जाती जमाती असल्यास जात प्रमाणपत्र .
- रहिवाशी प्रमाणपत्र .
- बँक खाते प्रमाणपत्र
- रेशनकार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र (परंतु कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते .)
- जन्मतारखेचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
- दिव्याग असल्यास तसे प्रमाणपत्र
- बचत गट सद्यस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची प्रत .
- दारिद्रय रेषेखालील असेल तर प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल .
- रोजगार ,स्वयं रोजगार कार्यालयाकडे नाव नोंदणीकार्ड प्रत सदरील कागदपत्रे लाभ घेण्यासाठी जोडणे अनिवार्य असेल .
पशुसंवर्धन योजना २०२५-२६ अर्ज कुठे आणि कसा भरायचा .
- अर्जदारांसाठी अर्ज करण्यासाठी मुदत दि . ३/०५/२०२५ ते २/६/२०२५ पर्यंत असेल .
- योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ah-mahabms.com या संकेतस्थळा वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात . आणि गुगल च्या Play Store वर जाऊन mobile Application AH – MAHABMS डाऊनलोड करावे आणि अर्ज करावा .
- अर्ज करताना वयक्तिक माहिती अचूक भरावी चूक झाल्यास फक्त एकदाच बदल करता येईल.ते पण या वर्षी नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थीसाठी बदल करण्याची संधी असेल .
- सन २०२१-२२ ,सन २०२२-२३ सन २०२३-२४ या काळात अर्ज करणाऱ्या लाभार्थींनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही कारण या सन २०२१ ते २०२६ या पाच वर्षाच्या कालावधी करिता ग्राह्य धरण्यात येतील .
- टीप –
- योजनेंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्ठीने देणे बंधनकारक राहील .
- त्याकरिता बंध पत्राचा नमुना पाहण्याकरिता pdf पहा .Bandhaptra Cow
- योजने संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरीता योजनेचा तपशिल व वेळापत्रक पाहावे .
निष्कर्ष :-
पशुसंवर्धन योजना २०२५-२६ राज्यातील नागरिकाकरिता सन २०२५-२०२६ राज्यस्तरीय ७५%अनुदान योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे.सदर योजना स्वयं रोजगार च्या अनुषगाने महाराष्ट्र शासन आणि पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती आणि जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला बचत गट,अल्प भूधारक शेतकरी .(१ ते २ हेक्टर शेती असणारे .),सुशिक्षित बेरोजगार इत्यादी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात .
पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील नागरिकांनकरिता सन २०२५-२०२६ राज्यस्तरीय ७५%अनुदान योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे. सदर योजनेची सविस्तर माहिती ,तसेच अर्ज कुठे व कसा भरावयाचा ,त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील , योजनेंतर्गत कोणत्या प्रकारच्या गायी व म्हशी मिळणार त्यांचे वाण कोणते त्यासाठी लागणारा स्वहित खर्च किती त्यावरती शासनाचे अनुदान किती मिळणार ,त्यादि बाबत सविस्तर माहिती दिली आहे . सर्व माहितीचा लाभ आपणास व्हावा तसेच आपल्या मित्र परिवार यानाही मिळवा त्याकरिता संबधित माहिती इतरांबरोबर शेअर करा .तसेच याबाबत काही प्रशन असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकतात .
धन्यवाद !
FAQ-
१. पशुसंवर्धन योजना २०२५-२६ योजनेकरिता अर्ज कुठे करावा ?
⇒ योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ah-mahabms.com या संकेतस्थळा वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात . आणि गुगल च्या Play Store वर जाऊन mobile Application AH – MAHABMS डाऊनलोड करावे आणि अर्ज करावा.
२. पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील नागरिकांनकरिता सन २०२५-२०२६ राज्यस्तरीय ७५%अनुदान योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे पण कोण कोण लाभ घेऊ शकतात ?
⇒ अनुसूचित जाती आणि जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला बचत गट,अल्प भूधारक शेतकरी .(१ ते २ हेक्टर शेती असणारे .),सुशिक्षित बेरोजगार इत्यादी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात .
३. पशुसंवर्धन योजना २०२५-२६ योजनेंतर्गत अनुदान मिळवण्याकरीता स्वहिस्सा किती भरावा लागेल ?
⇒ अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी २५% स्वहिस्सा तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% स्वहिस्सा भरावा लागेल .