घरकुल योजना -२०२५साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ,योजनेचे निकष,अर्ज कुठे करावा इत्यादी बाबत सविस्तर माहिती मिळवा आणि लगेच अर्ज करा.
घरकुल योजना -२०२५ प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Gramin योजनेसाठी केंद्रसरकार ने ६.५ लाख घरे मंजूर केली होती हे घरांचे टारगेट होते.परंतु त्यामध्ये वाढ करून अतिरिक्त १३ लाख घरे देण्यात आली आहेत . यावर्षी केंद्रसरकारच्या वतीने महाराष्ट्रातील गरिबांकरिता , कच्च्या घरात राहणाऱ्या करिता ,बेघर असणारे करिता केंद्रसरकार मार्फत एका वर्षात २० लाख घरे देण्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री मा.शिवराजसिंग चव्हाण यांनी घरकुल योजना -२०२५ साठी घोषणा केली आहे .
घरकुल योजना -२०२५ या योजनेसंदर्भात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संकल्प सर्वांसाठी हक्काचे पक्के घर असा असून ,महाराष्ट्र करिता २० लाख घरे मंजूर केलेली आहेत .त्यामधील सर्वेक्षण करिता पूर्वी असेलेले निकष शिथिल करून नवीन सर्वेक्षण करून ,पूर्वी सदर योजनेतून वंचित राहिलेल्या आणि नवीन लोकांची देखील निवड केली जाणार आहे.सदर योजनेकरिता १३,२९,६७८ घरांची घोषणा केली आहे. त्यामध्ये मागील ६,३७,०८९ घरांचा विस्तार केला जाणार असून एकूण एका वर्षात १९,६६,७६७ घरे दिली जातील .तसेच प्रतीक्षा यादीत असणारे लोकांचा देखील विचार केला जाणार आहे आणि येत्या ५ वर्षात जास्तीत जास्त लोकांना या सदर योजनेचा फायदा दिला जाणार आहे.
घरकुल योजना -२०२५ हि सदर योजना राबविणारा विभाग – ग्रामीण विकास मंत्रालय ,भारत सरकार
इंदिरा आवास योजनेची पुनर्रचना करून १ एप्रिल ,२०१६ पासून योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण मध्ये केले आहे .
१. घरकुल योजना -२०२५ योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया कशी केली जाते ?
- सन २०११ च्या सामाजिक, अर्थीक , जात सर्वेक्षणनुसार प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्राधन्य क्रम यादीAawas softwere वर उपलब्ध आहे .ती सदर यादी ग्रामसभेपुढे जाहीर ठेवून त्यातील पात्र लाभार्थी निवड करण्यात येईल .
- प्राधन्य क्रम यादी हि बेघर तसेच १ खोली असणारे लाभार्थी , २ खोली असणारे लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे .
- तसेच लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोतेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
- प्राधान्यक्रम नुसार व्यक्तीची ग्राम्साभेद्वारे निवड करताना काही निकषाची पूर्तता करावी लागणार आहे ते निकष कोणते ते पाहूया .
- घरकुल योजना -२०२५ योजनेसाठी निकषाच्या पूर्ततेच्या आधारे यादी तयार केली जाते .व त्याची ग्रामसभेत मांडणी करून लाभार्थी निवड केली जाते . आणि त्यानंतर ती मंजूर यादी ग्रामपंचायतच्या फलकावर लावली जाते .
२. प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Gramin योजनेचे निकष –
- १६ ते ५९ वयोगटातील प्रोढ व्यक्ती नसलेले कुटुंब .
- महिला कुटुंबप्रमुख व १६ ते ५९ वयोगटातील प्रोढ व्यक्ती नसलेले कुटुंब .
- २५ वर्षावरील अशिक्षित /निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब .
- अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारिरी दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही .
- भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत मोलमजुरी असेल .
वरीलप्रमाणे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थीची घरकुल योजना -२०२५ प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Gramin या योजनेसाठी निवड केली जाईल .
३. घरकुल योजना -२०२५ योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
घरकुल योजना -२०२५ प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Gramin सदर योजनेचा लाभ घेण्यासाठीonline नोंदणी होत नाही तर अर्ज हा offline पद्धतीने गावातील ग्रामपंचायत मध्ये आणि तालुक्याच्या पंचायत समितीकडे घरकुलासाठी अर्ज करावा लागतो .
४. घरकुल योजना -२०२५ अंतर्गत प्रती लाभार्थी दिले जाणारे अनुदान ?
अर्थ सहाय्य –
- केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत सदर योजनेस निधी वितरीत केला जातो ज्यामध्ये निधी वाटपाचे प्रमाण हे ६०:४० असे आहे .
- ग्रामीण भागातील लाभार्थीसाठी – रु. १,२०,०००/-.
- डोंगरी भागातील लाभार्थीसाठी – रु.१,३०,०००/- .
- बांधकामाच्या टप्पे निहाय अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जाते .
प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Graminयोजनेव्यतिरिक्त इतर अर्थसहाय्य मिळते ?
- सदर योजनेच्या घरकुल अनुदानाव्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियान (SBM) अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना रु,१२०००/- शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते .
- तर मनरेगा या योजनेंतर्गत ९०/९५ इतक्या दिवसाचा अकुशल मनुष्य रोजगार मंजुरी देण्यात येते ( म्हणजे साधारणपणे रुपये . २२०००/- इतकी रक्कम ).
५. घरकुल योजना -२०२५ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
सदर योजनेद्वारे लाभ मिळवण्याकरीता पुढील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते .
- 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदणीपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र ,
- जातीचे प्रमाणपत्र ,
- आधार कार्ड ,
- रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल ,
- मनरेगा जॉब कार्ड ,
- बँक पासबुक झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे .
- घरकुल योजना -२०२५ सदर योजनेबाबत सविस्तर घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या website वरती जाऊन माहिती मिळवू शकतात .
६. निष्कर्ष –
घरकुल योजना -२०२५ किंवा प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Gramin सदर योजना हि महाराष्ट्र राज्यातील जनतेला निवारा प्रधान करणारी त्यांना त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य देणारी योजना आहे .त्याकरिता वरील दिलेल्या निकषांची पूर्तता करावी लागेल ,घरकुलासाठी निधी ग्रामीण भागातील लाभार्थीसाठी – रु. १,२०,०००/-, तर डोंगरी भागातील लाभार्थीसाठी – रु.१,३०,०००/- दिला जातो .तो बांधकामाच्या टप्पे निहाय अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जाते .यासाठी वर सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे जमा करावी लागतील .तर अर्ज हा offline पद्धतीने गावातील ग्रामपंचायत मध्ये आणि तालुक्याच्या पंचायत समितीकडे घरकुलासाठी अर्ज करावा लागतो .इत्यादि बाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे पाहिली आहे .हि माहिती नक्कीच सर्व वाचकांच्या फायद्याची आहे .वरील माहितीचा वापर करून आपण सर्वांनी सदर योजनेचा लाभ मिळवावा आणि इतरांनाही मिळवून देण्यासाठी सहाय्य करावे .
सदर योजनेबाबत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .
धन्यवाद !
७. FAQ –
प्रश्न १. घरकुल योजना -२०२५/प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Gramin या सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरीता वयाची अट आहे का ?
उत्तर – होय घरकुल योजनेचा लाभ मिळवण्याकरीता १६ ते ५९ वयोगटातील व्यक्ती सदर योजनेचा लाभ मिळवू शकते .
प्रश्न २. घरकुल योजना -२०२५ या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
उत्तर -सदर योजनेद्वारे लाभ मिळवण्याकरीता पुढील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते .
- 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदणीपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र ,
- जातीचे प्रमाणपत्र ,
- आधार कार्ड ,
- रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल ,
- मनरेगा जॉब कार्ड ,
- बँक पासबुक झेरॉक्स प्रत
इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे .
प्रश्न ३.प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Graminयोजनेव्यतिरिक्त इतर कोणत्या योजनेचे अर्थसहाय्य मिळते ?
उत्तर -घरकुल योजना -२०२५ या योजनेव्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियान (SBM) या योजनेंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना रु,१२०००/- शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते .तर मनरेगा या योजनेंतर्गत ९०/९५ इतक्या दिवसाचा अकुशल मनुष्य रोजगार मंजुरी देण्यात येते ( म्हणजे साधारणपणे रुपये . २२०००/- इतकी रक्कम ).या दोन्ही योजनेचा लाभ मिळवता येतो .